महावितरणतर्फे सेवा सेतू संकल्प अभियान संपन्न!
जळगाव, प्रतिनिधी : महावितरणतर्फे विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) कार्यालयाजवळ सेवा सेतू संकल्प अभियान राबविण्यात आले.या अभियानात वीज ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आदी योजनांवरील सबसिडी व सुविधांबाबत शेतकरी व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक वंदनकुमार सिंग,दीपककुमार सिंग, महावितरणचे कार्यकारी अभियंता साळी साहेब, माधुरी पाटील, प्रणिती पाटील, साजिद तडवी, मराठे साहेब, सपकाळे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हो