श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

धनदांडग्यांचे अतिक्रमण काढा, सर्वसामान्यांचा दिवाळी-दसरा हिरावू नका; मनसेचे मनपाविरोधात धरणे आंदोलन!

20 Oct 2026, 01:16 AM (IST)
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील लहान व्यापाऱ्यांवरील निवडक अतिक्रमण कारवाई थांबवावी मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर समान कारवाई,पार्किंगच्या जागेतील बेकायदा दुकाने हटवावीत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 1 ऑक्टोबर गुरुवार रोजी महानगरपालिकेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.लहान व्यापारी,आईस्क्रीम गाड्या, पाणीपुरी, भाजीपाला व फळ विक्रेते हातगाडीधारकांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेने यापूर्वीच निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला."गरीबांची हातगाडी दिसते, पण मोठ्या व्यापाऱ्यांनी पदपथावर केलेले अतिक्रमण दिसत नाही का? पार्किंगची जागा व्यवसायासाठी वापरल्याने रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का?"असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला असताना शहरातील अनेक व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगच्या जागेवर दुकाने व गाळे थाटण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहने रस्त्यावर नाईलाजास्तव उभी करावी लागतात. या जागेचे सर्व्हक्षण करून बेकायदा बांधकामे हटवावीत, शहरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास व अपघाताचा धोका दिवसेदिवस होत असताना धोकादायक खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी देखील करण्यात आली."स्वच्छ शहर, सुंदर शहर झाले पाहिजे, पण सामान्य नागरिकाचा रोजगार उद्ध्वस्त करून नव्हे," अशी भूमिका मनसेने मांडली.आंदोलनानंतर मनसे शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलने पुढील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलना वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, प्रदीप पाटील, योगेश पाटील, युसुफ खाटीक, राहुल चव्हाण, अली खाटीक, साजन पाटील, राजेश मराठे, विलास सोनार, खुशाल ठाकूर, दीपक राठोड यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.