Categories
Loading...
Weather...
Logo

Up India live TV news

BREAKING
जळगांव

घटनादत्त आरक्षणाची उपवर्गीकरण केल्यास राज्य शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील--मुकुंद सपकाळे!

20 Oct 2026, 12:49 AM (IST)
जळगाव :प्रतिनिधी दि -30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४१ प्रमाणे अनुसूचित जाती वर्गाला आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत केली आहे. आरक्षण हा अनुसूचित जातीचा घटनादत्त अधिकार आहे. या आरक्षणाच्या घटनादत्त अधिकाराचे उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलेला नाही. उपवर्गीकरणाची कोणतीही तरतूद राज्यघटनेत नाही. राज्य सरकार उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील .असा इशारा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीचे मुकुंद सपकाळेनी भादली ह्या गावी जाहीर सभेत केले.अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी दिनांक 4 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 2 वाजता शिवतीर्थ मैदान कोर्ट चौकातून भव्यजन आक्रोश महामोर्चा निघणार असून या महा मोर्चाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मा.आनंदराज आंबेडकर. आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना.रामदासजी आठवले.पीआरपी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे.तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप,भीमशक्ती संघटनेचे मा.खा.चंद्रकांत हंडोरे आणि दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार करणार असून या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुकुंद सपकाळे तथा विरोधी लोक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले यावेळी शेकडो महिला व गावातील ग्रामस्थ युवक उपस्थित होते.
रिपब्लिकन सेना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा उप-महानगराध्यक्ष दिंगाबर सोनवणे यांनी स्वतः रिक्षांवर पोस्टर चिटकवून जनजागृती केली.