श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

वरणगावात जनआक्रोश महामोर्चाचा एल्गार, प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

20 Oct 2026, 12:34 AM (IST)
जळगाव दि २९: आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात विरोधी लोक संघर्ष समितीने या मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील वामन नगर, सिद्धेश्वर नगर आणि तळवेल ह्या गावात प्रचार दौरा करण्यात आला या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या महामोर्चाला रिपब्लिकन सेनेचे मा.आनंदराज आंबेडकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री बबनराव घोलप, भीम शक्ती संघटनेचे माजी.खासदार चंद्रकांत हंडोरे आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे उपस्थित राहणार आहेत,प्रचार दौऱ्याला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक प्रमोद बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, तालुका नेते प्रशांत तायडे यांच्यासह रिपब्लिकन सेना आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते जन आक्रोश महामोर्चा रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता शिवतीर्थ मैदान कोर्ट चौक, येथून निघणार आहे. तरी सर्व आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने केले आहे.