Categories
Loading...
Weather...
Logo

Up India live TV news

BREAKING
जळगांव

गणपती विसर्जना दिनी दीक्षा संस्थेतर्फे गणेश भक्तांसाठी मोफत पाणी वाटप!

20 Oct 2026, 12:33 AM (IST)
जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी):निमखेडी शिवार येथील दीक्षा बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांसाठी मोफत पाणी वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला
संस्थेतर्फे शहरात जनजागृती, गरजूंसाठी मदत, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन जोपासने असे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. विसर्जन मिरवणुकी दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तहानलेल्या भाविकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली .याबाबत संस्थाध्यक्ष दीक्षा पाटील, उपाध्यक्ष वैशाली पाटील, सचिव सुरेखा पाटील यांनी सांगितलं की, सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाला संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं.