Categories
Loading...
Weather...
Logo

Up India live TV news

BREAKING
जळगांव

आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज, भाविकांमध्ये उत्साह!

20 Oct 2026, 12:21 AM (IST)
जळगांव दि. २४: दहा दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर (दि. २५ सप्टेंबर शुक्रवार रोजी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असून प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.

मिरवणूक मार्गावर कडेकोट बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली असून ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.

कृत्रिम तलावांची सोय
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. निर्माल्य संकलनासाठी विशेष केंद्र उभारण्यात आली असून भाविकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण
गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत विसर्जन साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. ढोल-ताशा पथकांची तयारी पूर्ण झाली असून उद्या सायंकाळपासून मिरवणुकांना सुरुवात होणार आहे