Categories
Loading...
Weather...
Logo

Up India live TV news

BREAKING
जळगांव

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; 15 तालुक्यांत पिके उद्ध्वस्त, सरसकट पंचनामे करून सरसकट मदतीची मागणी!

20 Oct 2026, 12:12 AM (IST)
जळगाव, दि. 27 -यंदा पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व यावल या 15 तालुक्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जून महिन्यात पाऊस पूर्णपणे लांबणीवर गेला. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने कमी अधिक प्रमाणात जोरदार बॅटिंग करत दोन महिन्यांची उणीव भरून काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि पेरणीला वेग आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने सुट्टी घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली, पेरलेले पीक वाया गेले जिल्ह्यात कापूस, मका, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग यासारखी मुख्य पिके पेरली जातात, मात्र पावसाअभावी ही पिके शेतातच करपून गेल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पेरणी केलेली पिके वाया गेली, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही चिंता शेतकऱ्यांसाठी वेदनादायी ठरत असून,
दुष्काळाची झळ आता मुक्या जनावरांनाही बसू लागली आहे. शेत बांधावर असलेलं गवत,मोकळ्या जंगलातील चारा जनावरांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी हिरवा चारा सुकून गेला असून, अनेक शेतकऱ्यांना बाजारातून महागडा चारा विकत घ्यावा लागू शकतो त्यामुळे दूध व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे पशुपालक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची जोरदार मागणी होत आहे. पंचनाम्यानंतर विलंब न करता सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रति हेक्टरी भरीव मदत मिळाल्याशिवाय शेतकरी सावरणार नाही, अशी भावना शहरी,ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये आहे.