श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

जळगाव आगारातील साखळी उपोषण तूर्त स्थगित; न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!

20 Oct 2026, 04:52 PM (IST)
जळगाव - प्रतिनिधी -जळगाव आगाराचे व्यवस्थापक संदीप पाटील यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले साखळी उपोषण अखेर तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
दि. ६ ऑक्टोबर २०२६ पासून कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, जळगाव विभागाच्या वतीने हे उपोषण सुरू करण्यात आले होते. याबाबत संघटनेचे विभागीय सचिव आणि जळगाव आगारातील चालक शैलेश नन्नवरे यांनी माहिती दिली.गेल्या काही काळापासून विनाकारण आणि चुकीच्या पद्धतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर कारवाया सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नाईलाजाने साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला,आज दि. ८ ऑक्टोबर गुरुवार रोजी विभाग नियंत्रकांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या चर्चेत विभागाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, विभागीय सल्लागार पालवे, विभागीय अध्यक्ष सुरेश तायडे आणि कामगार अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत प्रशासनाने आश्वासन दिले की, ज्या खोट्या कारवाया झाल्या आहेत त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल.,या आश्वासनाचा विचार करून वरिष्ठांच्या आदेशान्वये हे साखळी उपोषण तूर्त स्थगित करत असल्याचे शैलेश नन्नवरे यांनी सांगितले. मात्र, पुढील १५ दिवसात न्याय न मिळाल्यास या साखळी उपोषणाचे रूपांतर उग्र आमरण उपोषणात केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी विभागीय अध्यक्ष सुरेश तायडे, विभागीय कोषाध्यक्ष घनश्याम वाडे,अजय पाटील,सुनील नन्नवरे डेपो सचिव धनराज बनसोडे,रवी बेहरे,तसेच कास्ट्राईब संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.