श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

महापालिकेच्या निष्काळजीपणाने युवकाचा बळी; नाल्यात पडून नवल सोनवणेंचा मृत्यू, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

20 Oct 2026, 04:47 PM (IST)
जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहरातील शिवाजी उद्यानाजवळील रस्त्यावर महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका कुटुंबाचा आधार हरपला आहे. नाल्यालगत संरक्षक कठडे आणि धोकादायक फलक न लावल्याने नवल अर्जुन सोनवणे (रा. तुळजा माता नगर, मेहरूण) यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना दि. ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेच्या निषेधार्थ आज मृताची पत्नी भाग्यश्री नवल सोनवणे, भाऊ योगेश अर्जुन सोनवणे आणि रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील नागरिकांनी आयुक्त (ज.श.म.न.पा.), जिल्हाधिकारी आणि महापौर यांना निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
१) सदर रस्त्यावर लवकरात लवकर कठड्याचे बांधकाम करावे व धोकादायक फलक लावावेत.

२) नाल्यालगत कठडे बांधण्याची रक्कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावी.

३) संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे.

४) बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

५) मयत नवल सोनवणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी.

६) या धोकादायक कामाबाबत माहिती असूनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रभाग अधिकारी व नगर रचनाकार अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास १० दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.