जळगावात महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा ही शेतकऱ्यांची काळी दिवाळी, हा लोकशाहीचा दुष्काळ!
जळगाव : प्रतिनिधी
-महाविकास आघाडीच्या वतीने SIR प्रक्रिया, निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, EVM बंदी आणि शेतकऱ्यांना सरसकट १ लाखाची मदत व कर्जमाफी या विविध मागण्यांसाठी 6ऑक्टोबर मंगळवार आज रोजी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा, काँग्रेस पक्षाचे इतर संघटनाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मतचोरीवरून फडणवीसांवर हल्लाबोल.
"मतचोरीचा पापाचा धनी फडणवीस असून या देशात काय चाललंय? पहिली चोरी जर कुठून सुरू झाली असेल तर ती फडणवीसांपासून सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा त्यांना मिळाल्या. प्रत्येक मतदारसंघात १४-१५ हजार मते गायब आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. पश्चिम बंगाल, बिहारसह महाराष्ट्रात १ कोटी बोगस मतदानाच्या जोरावर हे सरकार आले आहे."
यावेळी वक्त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, EVM बंदी आणि पारदर्शक मतदार याद्यांची मागणी केली.
शेतीचे १००% नुकसान,पंचनामा फक्त थट्टा.
"सोयाबीन, मका, कापूस कोणतेच पीक शिल्लक नाही. तरीही सरकार पंचनाम्याच्या नावाखाली थट्टा करत आहे. सातबारा आणा, ID कार्ड आणा, ग्रीन कार्ड आणा असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. २५ ऑगस्टचा GR फसवा आहे. मशिनिद्वारे ओलावा बघणार म्हणून सांगितले जात आहे. ही १९७२ सारखी भयानक परिस्थिती आहे. आमची मागणी आहे - प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या."
काही शेतकऱ्यांनी तर "महागाईत १ लाख सुद्धा अपुरे आहे" अशी भावना व्यक्त केली. गुरांचा चारा, मजुरीचे वाढलेले दर आणि काढणीला आलेले सोयाबीन काढता न येणे यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे.
ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी असणार.
"तहसीलदारांना विचारले असता त्यांनी सांगितले ग्रामसेवक, तलाठी असे तिघे येऊन पंचनामा करतील मग विचार करून पैसे टाकतील. म्हणजे येणारी दिवाळी ही आमची काळी दिवाळी असणार आहे. जिल्ह्याला ४ मंत्री असूनही जिल्हा उपेक्षित आहे. जलजीवनचे पाणी शेतापर्यंत पोहोचले नाही."
लोकशाहीचा दुष्काळ
"हा पाण्याचा नाही तर लोकशाहीचा दुष्काळ आहे. आज प्रत्येक घटक नाराज आहे. महिला नाराज आहेत, युवक बेरोजगार आहेत, आदिवासी रस्त्यावर आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी धर्मभेद, जातीभेद करणारे हे कोणते शासन आहे?"
गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव लोकसभेत भाजपचाच खासदार आहे, पण त्यांनाच आपल्या मुख्यमंत्र्याकडे शेतकऱ्यांसाठी शिष्टमंडळ न्यावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे.