श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

एसटी बसमध्ये चढताना तोल जाऊन 10 वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू!

20 Oct 2026, 04:40 PM (IST)
जळगांव :पाळधी (प्रतिनिधी): 5 ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाळधी बस स्टॉप जवळ एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. बस मध्ये चढत असताना झालेल्या अपघातात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. कु.राजनंदिनी श्रीराम शिंदे, वय वर्ष 16 मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजनंदिनी ही पाळधी येथील स.न. झवर विद्यालयात इयत्ता 10 वीच्या वर्गात शिकत होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर तीच्या सावदा ह्या गावी परत जाण्यासाठी पाळधी बस स्थानकावर आली होती.

यावेळी जळगाव कडून येणारी MH 40 N 9641 क्रमांकाची बस रवजा ही एसटी बस स्थानकावर आली. राजनंदिनी बस मध्ये चढत असतानाच बस पुढे गेल्याने तिचा तोल गेला आणि ती एसटीच्या मागच्या चाकाखाली आली. यात तिचा जाग्यावरच मृत्यू झाला.या घटनेमुळे पाळधी बस स्थानकावर एकच पळापळ उडाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली,शाळकरी मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.