कर्जाने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रबोधन!
जळगांव -चोपडा:
समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चोपडा शाखेच्या वतीने वैजापूर कर्जाने येथील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला.
वैजापूर येथील मुलींच्या आश्रमशाळेत झालेल्या कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष डॉ. अय्युब पिंजारी, कार्यकर्ते संजय अहिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अधीक्षक सुहास देवराज, मुख्याध्यापक बछरे, बोदवडे, योगेश चौधरी, दिघाडे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते
कर्जाने येथील आश्रमशाळेत झालेल्या कार्यक्रमास अधीक्षक मनोज पाटील, जितेंद्र पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगिनी बाविस्कर, माध्यमिक मुख्याध्यापक प्रशांत गवळी, रामदास पावरा, विकास पाटील, इम्रान शेख, हेमलता पाटील, आपसिंग पावरा, अनिल डूडवे आदी उपस्थित होते.यावेळी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समाजात प्रचलित असलेल्या चमत्कारांचे दावे आणि जादूटोण्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासने सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली. चमत्कार हे हातचलाखी आणि वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारे कसे घडवले जातात, याचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थिनींनी कोणत्याही घटनेवर डोळेझाकून विश्वास न ठेवता प्रश्न विचारण्याची आणि सत्य पडताळून पाहण्याची सवय लावावी, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असा संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या प्रबोधनपर उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण होऊन त्या आपल्या कुटुंबात व समाजात वैज्ञानिक विचारांचा प्रसार करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परेश चित्ते, सुहास देवराज, मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले.