जळगावात आदिवासींचा रस्ता रोको; प्रशासनावर दुर्लक्षाचा गंभीर आरोप!
जळगाव :प्रतिनिधी -गेल्या 6 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज दि. 20 ऑक्टोबर 2026 मंगळवार रोजी दुपारी आदिवासी बांधवांनी शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन छेडले.
आम्ही वाट पाहत होतो की, प्रशासन आमच्याशी चर्चा करेल, शिष्टमंडळाला बोलावेल. परंतु जिल्हा प्रशासनाने आमच्या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. आम्ही आदिवासी असल्याकारणाने आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
नाईलाजास्तव आज 50 ते 100 महिला-पुरुषांना या ठिकाणी येऊन रस्ता रोको करावा लागला. याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन जबाबदार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि तेथील मच्छीमारीचा (मत्स्यव्यवसाय) अधिकार हा स्थानिक आदिवासींना देण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे.
गेल्या 10 दिवसांत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने आंदोलनाची पुढची दिशा अधिक तीव्र असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी भिल प्रदेश क्रांती सेना संस्थापक सुनील गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. मनोज भिल, विश्वनाथ वाघ, रोहण भिल, गोकुळ भिल, किरण भिल, भीमराज भिल, समाधान सोनवणे, संदीप सोनवणे, धनराज वाघ, विठ्ठल भिल, प्रदीप वाघ, रमेश वाघ, राज सोनवणे, मुकुंदा गायकवाड, मोहन गायकवाड, कृष्णा धुलकर, दिपक मोरे, नरसिंग वाघ, युवराज गायकवाड, संजय भिल, गोविंदा वाघ, अशोक भिल, रामा पवार, कालुसिंग भिल, अशोक राजाराम भिल, प्रदीप भिल, सुभाष वाघ, संतोष भिल, बळीराम भिल, ईश्वर भिल, सुनील पवार, समाधान पवार, समाधान सोनवणे, संजय पवार, निलेश पवार, विजय मोरे, दिपक भिल, खुशाल भिल, गणेश सोनवणे, मंगल वाघ, भरत वाघ आदी उपस्थित होते.