जळगाव जिल्हा व महापालिकातर्फे रग्बी शालेय स्पर्धेला प्रारंभ
जळगाव - प्रतिनिधी :जळगाव जिल्हा व महानगरपालिका रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आंतरशालेय रग्बी स्पर्धेचे आयोजन सागर पार्क मैदानावर बुधवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.या स्पर्धेचे जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर पाटील यांच्या हस्ते नाणे फेकून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत महापालिकेच्या 30 व जिल्ह्यातील 15 शाळांनी सहभाग नोंदवला होता,पंच म्हणून कृष्णा कुमावत व प्रणव पाटील यांनी कामकाज पाहिले.याप्रसंगी मनपा क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, अतुल गोर्डे , डिगंबर महाजन, अजय काशीद आदी उपस्थित होती,स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमीर खान, उदय फालक, शैलेश जाधव, संदीप महाजन, जयश्री माळी, लीना पाटील, छाया बोरसे, चारुशीला पाटील, टीना धनगर, प्रीतम पाटील, सिद्धांत वाणी यांनि विशेष परिश्रम घेतले.
उपवर्गीकरण विरोधी जन आक्रोश महामोर्चा आढावा बैठक!
जळगाव, प्रतिनिधी : उपवर्गी करण विरोधात विरोधी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, तयारीच्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे ही महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न होणार असून तरी .या बैठकीस शहर व ग्रामीण भागातील समस्त आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी,नागरिक महिला वर्ग युवक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महामोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले आहे.