श्रेणियाँ
Loading...
मौसम...
Logo

Up India live TV news

ब्रेकिंग
जळगांव

एकलव्य क्रांती संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा: भिल प्रदेश सेनेचा आज रास्ता रोको!

19 Oct 2026, 11:37 PM (IST)
जळगाव : प्रतिनिधी- भिल प्रदेश क्रांती सेनेच्यावतीने स्वतंत्र भिल प्रदेशच्या मागणीसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांसाठी दि. 14 ऑक्टोबर 2026 पासून शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनाला एकलव्य क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुधाकर सोनवणे यांनी आज शिवतीर्थ मैदानावर भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.

आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

यावेळी बोलताना सुधाकर सोनवणे म्हणाले, "आदिवासी हक्कासाठी एकजूट होणे ही काळाची गरज आहे. भिल प्रदेश क्रांती सेनेच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे."

प्रशासनाने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.